Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जिल्हा परिषद शाळांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये करोडोंचा घोटाळा! – भाजप किसान मोर्चाकडून चौकशीची मागणी

 



अंबड वार्ता, घनसावंगी (प्रतिनिधी) :

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये प्रचंड गैरव्यवहार उघड झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. श्री स्वामी समर्थ मल्टी सर्व्हिसेस, परभणी या संस्थेला 2024 ते 2025 या कालावधीत तब्बल २ कोटी ९९ लाख ४६ हजार रुपयांचे टेंडर देण्यात आले होते. मात्र या कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून कामकाजात सावळा गोंधळ केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

👉 ज्या शाळांमध्ये आठ कॅमेरे बसवायचे होते, तिथे फक्त पाचच लावले गेले, तसेच इतर आवश्यक साहित्यही पुरवले गेले नाही. इस्टिमेटप्रमाणे काम न करताच निधीचा अपव्यय करण्यात आला, असा आरोप करण्यात आला आहे.

या संपूर्ण गैरप्रकारात शिक्षणाधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अंकुशराव बोबडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित संस्था व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

🗣️ बोबडे यांनी स्पष्ट इशारा दिला –

“जनतेच्या पैशातून मुलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे होते, पण इथे मात्र भ्रष्टाचाराची कॅमेरे लावली आहेत! जर योग्य ती कारवाई झाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.”

Post a Comment

0 Comments