Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची यशस्वी कामगिरी

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

जालना :पारध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलगी पळवून नेण्याच्या गुन्ह्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मोठी कामगिरी बजावली आहे.

दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी अन्वा षांडा, ता. भोकरदन, जि. जालना येथील युवकाने पारध येथून एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी भा.न्या.सं. कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. बराच काळ लोटूनही मुलगी आणि आरोपी मिळून न आल्याने हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला.

तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपी व पीडित छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची खात्री पटली. त्यानुसार पथकाने कारवाई करून आरोपी आणि पीडित मुलगी यांना ताब्यात घेऊन पारध पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत अ.मा.वा.प्र. कक्षाच्या प्रभारी अधिकारी दिपाली शिंदे, पोउपनि रविंद्र जोशी, संजय गवळी, पोहेका कृष्णा देठे, सागर बावीस्कर, महिला अंमलदार संगिता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, रेणुका राठोड व चालक संजय कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments