घुंगर्डे हादगाव प्रतिनिधी
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. दिपकसिंग प्रतापसिंग पवार या शेतकऱ्यांच्या गट नंबर 230 मधील तब्बल दीड एकर ऊस महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक पेट घेऊन जळून खाक झाला.
या आगीमुळे पवार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अनेक महिन्यांचे परिश्रम काही क्षणात राख झाले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे शेतकरी कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले आहे.
दरम्यान, या नुकसानीबद्दल तत्काळ पंचनामा करून योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी दिपकसिंग पवार यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment
0 Comments