Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

“थेंबाने पाणी, ग्रामने खते – ऊसाचे उत्पादन दुप्पट करा!” – राजेश टोपे यांचा शेतकऱ्यांना मंत्र




अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 


थेंबाने पाणी आणि ग्रामने खते देऊन ऊसाची एकरी उत्पादन वाढवा-माजी मंत्री राजेश टोपे

अंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 चे औचित्य साधून कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना,अंकुशनगर युनिट नंबर-1 अंकुशनगर ता.अंबड व युनिटी नंबर -2 सागर,तिर्थपुरी ता.घनसावंगी यांच्या संयुक्त विद्यामाने एकरी 120 टन ऊस उत्पादन या विषयावर ऊस पिक परिसंवाद व भव्य शेतकरी मेळावा पार पडला.*या प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला.* याप्रसंगी बोलतांना राजेश टोपे म्हणाले की,शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुध्दीमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करावा. यासाठी ठिबक सिंचन अनिवार्य असल्याने कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. या परिसंवादाचे प्रमुख मार्गदर्शक ऊस तज्ञ तथा माजी शास्त्रज्ञ,श्री सुरेश माने पाटील यांनी आधुनिक शेती संदर्भातील बारकावे यावेळी सांगितले.

यावेळी बोलतांना श्री सुरेश माने पाटील म्हणाले की,एकरी 120 ते 140 टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शास्त्रोक्त पद्धतीने ऊस पिकाची लागवड, मशागत, खत व पाण्याचे व्यवस्थापन,शेणखत, सेंद्रिय खते,कंपोस्ट खत,ग्रीणहार्वेस्ट खत, प्रेसमड, राख याचा वापर करणे,हिरवळीचे खतासाठी तागाची पेरणी करणे व ते जमीनीत गाडाने,. ऊसाचे पाचरट जमिनीत कुजवने,जमीनीचे आरोग्य नेहमी चांगले ठेवने,.पाच फुट किंवा सहा फुट सरी पध्दतीने दोन फुटांवर एक रोप याप्रमाणे ८६०३२,१०००१,६७१,१५०१२,१३००७,१८१२१ या सुधारीत जातीचे ऊसाची लागण करणे, माती परीक्षण करून घेऊन शिफारशी नुसार खत मात्रा देणे, ऊस शेतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे.ठिबकद्वारे पाणी व खत व्यवस्थापन करणे, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बेणे मळा तयार करावा,ऊस लागवडीसाठी चांगल्या प्रकारचे व सुधारित ऊस जातींचे ऊसाची निवड करावी. संतुलित प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,जमिनीतील चांगले गुणधर्म टिकवून ठेवावेत

याप्रसंगी श्री जयदेव बर्वे, नेचर केअर फर्टीलायझर प्रा.लि. विटा-सांगली, श्री प्रकाश कदम, के.बी. ॲग्रोनॉमिक्स प्रा.लि. विटा-सांगली,सोनहीरा कारखान्याचे संचालक श्री दिपक भोसले, कारखान्याचे संचालक मंडळातील सर्व सदस्य, कार्यकारी संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, व परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments