अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जालना : शहरातील बसस्थानक परिसरात पोलिसांनी एक मोठी कारवाई करत राजमाता लॉजमध्ये सुरु असलेला कुंटणखाना उध्वस्त केला. या कारवाईत लॉज मॅनेजरसह तीन पुरुष आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी छापा टाकून आरोपी कृष्णा दौलतराम हरदेकर (वय 38, रा. संभाजीनगर, जालना) याला पोलिसांनी जेरबंद केले. याच्यासोबत लॉजमध्ये आढळून आलेले आरोपी – रवि रामदास जाधव (वय 35), गजानन श्रीराम जाधव (वय 32) व दिपक विष्णु जोशी (वय 22) यांना देखील ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ₹2280/- रोख रक्कमही जप्त करण्यात आली.
चार महिलांची सुटका करून सदर आरोपींविरुद्ध सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई मा. अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाईत सपोनि योगेश उबाळे, सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ तसेच स्थागुशाचे अमंलदार यांचा सक्रिय सहभाग होता.

Post a Comment
0 Comments