विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड
बंडु शिंगटे / घुंगर्डे हादगाव
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर आणि लालबहादुर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालय, परतूर (जि.जालना) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच जिल्हास्तरीय आविष्कार–२०२५ स्पर्धा उत्साहात पार पडली.जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी संशोधन व नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित प्रकल्प सादर करून स्पर्धेला उंची दिली.
या स्पर्धेत कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,अंकुशनगर येथील कला शाखेच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी मोहिनी अरुण गोसावी हिने “डिजिटल इंडिया मध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची भूमिका” या विषयावर प्रकल्प सादर केला.तिच्या सखोल अभ्यास,प्रभावी मांडणी व नावीन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे परीक्षकांनी तिच्या प्रकल्पाला तृतीय क्रमांक प्रदान केला.तिच्या या कामगिरीमुळे तिची निवड आता विद्यापीठस्तरीय आविष्कार–२०२५ स्पर्धेसाठी झाली आहे.मोहिनीच्या यशामागे महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एम.बी.वैद्य यांचे विशेष मार्गदर्शन व मेहनत महत्वाची ठरली.त्यांनी प्रकल्पाच्या तयारीसाठी सातत्याने मदत करून विद्यार्थिनीला आत्मविश्वास दिला.
या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.ए.खान,प्रा.अशोक गायकवाड,प्रा.शिवाजी गायके,प्रा.विक्रांत डावकर,प्रा.भगवान यादव,प्रा.एस.एस.जगताप,प्रा.भालेकर, प्रा. चिंतामणी,प्रा.पाबळे,प्रा.तोर,प्रा.पघळ,प्रा.साखरे मॅडम,तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी मोहिनीचे अभिनंदन केले.त्यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना, “या यशामुळे आमच्या महाविद्यालयाचा सन्मान अधिक उंचावला आहे” असे मत व्यक्त केले.मोहिनीच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या विद्यापीठस्तरीय कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments