अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जालना : नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा प्रकरणात आज पुन्हा ४ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. या अगोदरच न्यायालयाने १८ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले होते.
शासनाने २०२२, २०२३ व २०२४ मध्ये अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून अनुदान वाटपाचे आदेश दिले होते. मात्र, सदर अनुदान वाटप प्रकरणात मोठ्या प्रमाणावर शासकीय निधीचा अपहार झाल्याचे समोर आले. त्यामुळे अंबड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४५३/२०२५ नोंदवून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
या प्रकरणात काही आरोपींनी पोलिसांना चकवा देत अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. यावर सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील श्री. बाबासाहेब इंगळे यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर मा. श्री. गायधनी साहेब, जिल्हा व सत्र न्यायाधीश, अंबड यांनी आज दिनांक १५/०९/२०२५ रोजी ४ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले.
यापूर्वी १२/०९/२०२५ रोजी न्यायालयाने १८ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले होते. या प्रकरणात सध्या एक आरोपी अटकेत असून त्याचा पीसीआर सुरू आहे. उर्वरीत आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
📌 आज फेटाळलेले आरोपी
१) गणेश रुर्षीदर मिसाळ (रा. दुधना काळेगाव, ह.मु. चांगले नगर अंबड)
२) विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर (रा. लाडसावंगी, छ. संभाजीनगर)
३) सुनिल रामकृष्ण सोरमारे (रा. श्रीकृष्ण नगर, अंबड रोड, जालना)
४) डिगंबर गंगाराम कुरेवाड (रा. प्लॉट नं. २०, महालक्ष्मी रेसीडेन्सी, जालना)
⚖️ यापूर्वी जामीन फेटाळलेले १८ आरोपी
रमेश लक्ष्माण कांबळे, सुकन्या श्रीकृष्ण गवते, कृष्णा दत्ता मुजगुले, विजय हनुमंत जोगदंड, निवास बाबुसिंग जाधव, विनोद जयजयराम ठाकरे, प्रविण भाऊसाहेब सिनगारे, सुरज गोरख विक्कड, केलास शिवाजीराव घारे, बाळु लिंबाजी सानप, वप्पासाहेब रखमाजी भुसारे, दिनेश ज्ञानेश्वर बेराड, मोहीत दत्तात्रय गोषीक, रामेश्वर गणेश बारहाते, शिवाजी श्रीधर डालके, वैभव विश्वभरराव आडगावकर, विजय निवृत्ती भांडवले, किरण रविंद्रकुमार जाधव.
👮 ही कामगिरी पार पाडणारे अधिकारी व कर्मचारीमा. श्री. अजयकुमार वंन्सल, पोलीस अधीक्षक, जालनाश्री. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक, जालनाश्री. सिद्धार्थ माने, प्रभारी पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखाश्री. मिथुन घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखातसेच पोलीस अंमलदार : गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, श्रेयश वाघमारे, महिला अंमलदार जयश्री निकम, निमा घनघाव, मंदा नाटकर
Post a Comment
0 Comments