Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तेली समाजाचा अभिमान! गायक राज प्रल्हादराव रायते यांना ‘तेली समाज भूषण’ पुरस्काराने गौरव

 


छत्रपती संभाजीनगर, दि. ७ सप्टेंबर:

तेली समाजातील तरुण गायक राज प्रल्हादराव रायते यांना तेली समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित खासदार संदीपानजी भुमरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या भव्य सोहळ्याचे आयोजन तेली सेना पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केले होते.

संगीतातून समाजासाठी कार्य राज रायते हे आपल्या सुमधुर आवाजाने आणि संताजी जगनाडे महाराजांवरील सुप्रसिद्ध गीतांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात घराघरात पोहोचले आहेत. त्यांच्या गाण्यांचे लेखन त्यांच्या वडील प्रल्हादराव रायते यांनी केले असून, मातोश्री सोनाली रायते यांचाही मोठा मोलाचा वाटा आहे.

लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या राज रायते यांनी सातत्यपूर्ण रियाज, गुरु सचिन राऊत यांचे मार्गदर्शन, आणि समाजाचा पाठिंबा यामुळे अल्पावधीतच अनेक राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले आहेत.

समाजासाठी पहिलं गीत – एक इतिहासएका लग्नसमारंभात सहज गायलेले गीत प्रचंड गाजल्यानंतर, “आपल्या समाजावर गीत का नाही?” या प्रश्नातून राज रायते यांनी त्यांच्या वडिलांच्या साथीने तेली समाजावरील पहिले गीत सादर केले. आज ते गीत संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर गाजत आहे आणि तेली समाजाला एकत्र आणणारे ठरत आहे.

समाजातील मान, जनतेचे प्रेमराज रायते यांना माजी मंत्री जयदत्त अण्णाजी क्षीरसागर यांनी सर्वप्रथम मोठ्या स्टेजवर संधी दिली. त्यानंतर गावोगावी, राज्यभरात त्यांच्या भव्य सत्कारांचा आणि पुरस्कारांचा वर्षाव सुरूच आहे. सध्या ते बीड जिल्ह्यातील बलभीम कॉलेजमध्ये BCA चे शिक्षण घेत असून, स्पर्धांमधून कॉलेजलाही मान मिळवत आहेत.

गायकाचा संदेशपुरस्कार स्वीकारताना राज रायते म्हणाले –

👉 “माझ्या यशामागे माझ्या आई-वडिलांचा आणि संपूर्ण समाजाचा मोलाचा वाटा आहे. संताजी जगनाडे महाराजांवरील गीतांद्वारे समाजजागृती करत राहणे हेच माझे ध्येय आहे.”

🔥 तेली समाजाचा हा पहिला सुप्रसिद्ध गायक आज केवळ समाजाचा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि भारताचा अभिमान ठरला आहे. राज प्रल्हादराव रायते – समाजाचा खरा भूषण!

Post a Comment

0 Comments