Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी – राजेश भैया टोपे यांची मागणी

 



पारनेर प्रतिनिधी जालना जिल्ह्यासह अंबड-घनसावंगी तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडले असून कपाशी, सोयाबीन व फळपीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर माजी मंत्री राजेश भैया टोपे यांनी पुढाकार घेत शेतकरी बांधवांना तातडीने मदत मिळावी अशी जोरदार मागणी केली आहे.

👉 टोपे यांची मागणी :

महसूल विभागाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.

विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी जाचक अटी टाळून सर्व्हे करावा.

शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी याची काटेकोर काळजी घ्यावी.

"शेतकरी बांधवांनी खचून न जाता धैर्याने संकटाचा सामना करावा. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून नुकसानभरपाई मिळवून देऊ," असे आश्वासन राजेश भैया टोपे यांनी दिले.

Post a Comment

0 Comments