अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जालना क्रीडा युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये अंकुशराव टोपे महाविद्यालयातील विद्यार्थी कु. विनायक किनकिने यांनी तलवारबाजी स्पर्धेमध्ये 19 वर्षा आतील वयोगटामध्ये प्रथम क्रमांक आणि कु. संतोष खंडाळे यांनी कुस्ती स्पर्धेमध्ये ग्रीक रोमन प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला या यशाबद्दल माजी आरोग्यमंत्री तथा मस्त्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आ. राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माननीय मा. आ. राजेशभैय्या टोपे यांनी महाविद्यालयाचे नाव उंचावले याबद्दल विजेत्या खेळाडूचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर गायकवाड, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, क्रीडा विभागप्रमुख डॉ. भुजंग डावकर, डॉ. रामदास वैद्य, कार्यालयीन अधीक्षक श्री. सुरेश चव्हाण, प्रा. चंद्रकांत लाटेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments