Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबड उपविभागात पोलीस पाटील भरती २०२५ साठी गावनिहाय आरक्षण सोडत जाहीर





 अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके


अंबड : उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, अंबड यांच्या वतीने दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस पाटील भरतीसाठी गावनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेकडो गावांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या विविध प्रवर्गांनुसार व महिला प्रवर्गासाठी स्वतंत्रपणे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.


सर्वसाधारण प्रवर्गाखाली बोरगाव खुर्द, वाडी शिराढोण, भद्रेगाव, काटखेडा, गोरी, पांगरी, गोला, रामगव्हाण खुर्द, साकळगाव, राजेगाव, अंतरवाला बु, रामगव्हाण बु, वडी रामसगाव, मंगु जळगाव, राजणीवाडी, गंधारी, अवलगाव खुर्द, रेणापुरी, अबड, शहापुर, टाका, सारंगपुर, पांगरखेडा, हातडी, बोदलापुरी, रवना, मादळा, जालुरा, अंतरवाली टेभी, बहिरेगाव, खालापुरी, साडेसावंगी, माडर्डी, राहुवाडी संत सेवालाल नगर, जोगेश्वरवाडी, लमानवाडी, वलखेडा, पिंपरखेड खुर्द, कर्जत, शिरनेर, सौदलगाव खुर्द, नारायणगाव, कोठी, धोन्सी बु., बनटाकळी, देशगव्हाण, कोठाला खुर्द, दहीपुरी, भांबेरी, देवी देहेगाव, लालवाडी, राहेरा, आलमगाव, राजणी, मठ जळगाव, पानेवाडी, जामखेड, शिदखेड, डावरगाव, भुलेगाव, शेवता, शिंदेवडगाव, शहागड, रोहिलागड, निपाणी पिंपळगाव, झिरपी, पागीरवाडी, अंतरवाला आवा, वाळकेश्वर, मुद्रेगांव, खेडगांव, भोगगांव, अंतरवाली दाई, झोडेगांव, मंगरुळ, साष्टपिंपळगांव, एकलहेरा, मासेगांव, बळेगांव, लासुरा, बोडखा बु, कृष्णापुरवाडी, बानेगाव, दहीगव्हाण बु, चिंचखेड, शिवनगाव, वडीलासुरा, चिकनगांव, सौदलगाव बु, कुंभार पिंपळगाव, बोरी, मसई, करडगांव, गहीनाथनगर, धाकलगांव, पराडा, बनगांव, इत्यादी गावांचा समावेश आहे.


महिला आरक्षणाखाली – अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी चंदनापुरी बु, यावल पिंप्री, बोर राजणी, अंतरवाली राठी, रामसगाव, घाणेगांव, उक्कडगांव; अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी वाघलखेडा, शिराढोण, धनगर पिंप्री, बदापुर; विशेष मागास प्रवर्ग महिला – हरतखेडा, चाभारवाडी; विमुक्त जाती-अ महिला – घोन्सी तांडा नं.१, पांगरा तांडा; भटक्या जमाती-ब महिला – बेलगांव, चुर्मापुरी; भटक्या जमाती-क महिला – बठाण खुर्द, वडीगोदी; भटक्या जमाती-ड महिला – भगवान नगर, दहीपुरी, दैठणा ब, देवळी, भोकरवाडी; इतर मागास प्रवर्ग महिला – माळयाचीवाडी, हस्तपोखरी, अंतरवाली सराटी, राणी उंचेगाव, आपेगाव, ताडहादगाव, मठपिंपळगांव, मच्छीद्रनाथ चिंचोली, चित्रवडगांव; सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग महिला – आवा, लेभेवाडी, श्रीपत धामणगांव, पांगरा, चापडगांव; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला – येवला, बाचेगांव, डहाळेगांव, मुर्ती, मुढेगांव, खडकावाडी, दोदडगाव; खुला महिला – करजळा, अरगडेगव्हाण, देवहिवरा, नागझरी, कुरण, राजुरकरकोठा, दहीगव्हाण खुर्द, कृष्णनगर, विरेगव्हाण तांडा, रामनगर, गादेसावरगाव, भोकरवाडी, देवळी.


याशिवाय खुला सर्वसाधारण प्रवर्गाखाली मुरमा खुर्द, इंदलगाव, भेडाळा, देवडीहादगाव, माहेरजवळा, गुरुपिंप्री, लिंबी, कंडारी, सरफगव्हाण, लिंबोणी, कुक्कडगाव, सिध्देश्वर पिंपळगाव, शेवगळ, पाथरवाला बु, सोनक पिंपळगाव, भादली खुर्द, भालगाव, दाढेगाव, पिठोरी सिरसगाव, दुनगाव, पिरगैबवाडी, दहयाळा, ईश्वरनगर, वसतनगर, झिरपी तांडा, गंगारामवाडी, बक्ष्याचीवाडी, गुनानाईक तांडा, निहालसिंगवाडी, कौचलवाडी, गोविंदपुर, यावलपिंप्री तांडा या गावांचा समावेश आहे.


या सोडतीनंतर पोलीस पाटील भरतीची पुढील प्रक्रिया राबवली जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी नियमानुसार अर्ज दाखल करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments