अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जालना जिल्ह्यातील तडागाव येथे जीवनविद्या तत्त्वज्ञानाचा दिव्य प्रचार प्रसार होणार असून भांडुप ज्ञानसाधना केंद्र, मुंबई यांच्या वतीने दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
“मन करा रे प्रसन्न” या विषयावर मार्गदर्शक म्हणून जीवनविद्या प्रबोधक व उद्योजक श्री दशरथजी शिरसाट (मुंबई) ग्रामस्थांशी संवाद साधून अमूल्य जीवनदर्शन घडवणार आहेत.
🔔 सकाळी ८ ते १०.३० या वेळेत – घरोघरी ग्रंथदिंडी व प्रार्थना जपयज्ञ
🔔 सायं. ४ ते ६ – मासेगाव येथे प्रार्थना जपयज्ञ*
🔔 सायं. ७ ते ९ – हरिपाठ व प्रवचन
📌 कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे.
📌 मात्र मिळणारा लाभ अमूल्य ठरणार आहे.
गावकऱ्यांना, बंधूभगिनींना आणि भक्तगणांना या दिव्य कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments