Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अंबड तहसील कार्यालयात राष्ट्रध्वजाला सलामी!

 


अंबड वार्ता प्रतिनिधी प्रतिनिधी आकाश जळके 


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी अंबड तहसील कार्यालयात तहसीलदार विजय चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. या वेळी परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला.


 पुरवठा अधिकारी खांडेभराड, नायब तहसीलदार एकनाथ भोजने, मंडळ अधिकारी नरोटे,अंबड पोलीस स्टेशनचे पीआय संतोष घोडके, api अमोल गुरले पीएसआय भगवान नरोडे, पीएसआय रंजना बांगलानी पोलीसकर्मचारी व तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्तीसाठी रक्त सांडणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या अमोल बलिदानाची आठवण करून त्यांच्या कार्याला वंदन केले. त्यांनी बलिदानाच्या जाज्वल्य परंपरेतून प्रेरणा घेऊन लोकशाही, सामाजिक ऐक्य आणि विकासासाठी निष्ठा ठेवण्याचा संकल्पही व्यक्त केला.


या सोहळ्यामुळे तहसील कार्यालय परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

0 Comments