पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्या फाउंडेशन व सीसीएच, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयुर्वेद आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नामवंत आयुर्वेदाचार्य डॉ. प्रशांत खरात यांनी मार्गदर्शन केले.
📌 शिबिरादरम्यान एकूण १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. आरोग्य समस्यांवरील उपचारासोबतच आयुर्वेद पद्धतीनुसार निरोगी जीवन कसे जगावे, याविषयी डॉ. खरात यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
बोलताना त्यांनी स्पष्ट केले –
“आयुर्वेद ही फक्त औषधपद्धती नसून ती जीवन जगण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. योग्य आहार, विहार, विचार आणि दिनचर्या पाळली तर औषधांची गरजच भासत नाही.”
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी हेल्थ मित्र तेजस भगवत, रोहित खो़टकऱ, शुभम ताबे, प्राजक्ता कजळे व ऋषिकेश धनायत यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजामध्ये आयुर्वेदाचे महत्त्व पोहोचवणे, तसेच सर्वांगीण आरोग्याकडे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे हा होता.
🌱 या शिबिरामुळे सहभागी नागरिकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जागरूकता वाढली असून, “आरोग्य हीच खरी संपत्ती” या विचाराला नवी
दिशा मिळाली.

Post a Comment
0 Comments