अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
. १८ सप्टेंबर २०२५ रोजी अंबड व घनसावंगीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सिद्धेश्वर धुमाळ यांनी नवरात्र महोत्सव २०२५ अनुषंगाने संस्थान परिसराची थेट पाहणी केली. यात्रेदरम्यान लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने पार्किंग, दुकाने, नारळ, कटलरी, ज्वेलरी आदी व्यवस्था प्रत्यक्ष तपासून त्यांनी संबंधितांना काटेकोर सूचना दिल्या.
या वेळी संस्थानच्या पुजारी व विश्वस्त सौ. गीता विलास कुंटेफळकर, संस्थानचे व्यवस्थापक श्री. कैलास शिंदे तसेच कर्मचारी उपस्थित होते.
👉 डी.वाय.एस.पी. धुमाळ यांचा स्पष्ट संदेश:
“नवरात्र यात्रेत भाविकांना कुठलाही त्रास होऊ देणार नाही. पाकीटमार, टवाळखोर व गावगुंडांवर पोलिसांची चोक नजर असेल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस २४ तास तत्पर आहेत.”
🚔 यात्रेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा तगडा बंदोबस्त उभारला जाणार असून भाविकांनी निर्धास्तपणे उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
🌟 नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण –
“डी.वाय.एस.पी. सिद्धेश्वर धुमाळ यांची दूरदृष्टी आणि सजग पाहणीमुळे यंदाची नवरात्र यात्रा निर्विघ्न, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पडेल.”

Post a Comment
0 Comments