Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अजब कारभार : पाच हजाराशिवाय बिल नाही! घनसावंगी पंचायत समितीतील घरकुल विभागाचा भ्रष्टाचार उघड

 



अबंड वार्ता तालुका प्रतिनिधी घनसावंगी :

घनसावंगी पंचायत समितीच्या घरकुल विभागातील अधिकाऱ्यांचा अजब कारभार समोर आला आहे. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना न देता, या विभागातील अधिकारी थेट “पाच हजार रुपये दिल्याशिवाय बिल टाकत नाही” अशा उघड लाचखोरीत गुंतले असल्याचा आरोप होत आहे.


डीपीआयचे जिल्हा युवाअध्यक्ष गणेश लोंढे यांनी या गंभीर प्रकाराबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशीची मागणी करत निवेदन सादर केले.


👉 भ्रष्ट अधिकाऱ्यांचा कारभार


खरे लाभार्थी घरे बांधूनही त्यांची बिले थांबवली जातात.


पाच हजार रुपये दिल्यावर लगेच बिल टाकले जाते.


जुनी घरे केवळ रंगरंगोटी करून नवे दाखवले जात आहेत.


खोटे जीओ-टॅग करून खोट्या लाभार्थ्यांची बिले काढली जातात.



👉 लाभार्थ्यांचा छळ

घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून गरीब व सर्वसामान्य नागरिक वर्षानुवर्षे प्रतीक्षा करत आहेत. पण अधिकारी वेगवेगळी कारणे सांगून लाभार्थ्यांना मानसिक छळ करत आहेत. पैसे न दिल्यास त्यांची घरे पूर्ण झालेली असूनही बिले टाकली जात नाहीत.


👉 गटविकास अधिकाऱ्यांचा मौन?

तक्रारी करूनही गटविकास अधिकारी संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करत नाहीत. उलट अधिकारी बिनधास्तपणे लाभार्थ्यांकडून लाच उकळत असल्याचा आरोप होत आहे.


👉 डीपीआयचा इशारा

या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, तर डीपीआयच्यावतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा जालना जिल्हा युवक अध्यक्ष गणेश लोंढे यांनी दिला आहे.


⚡ सरकारने तातडीने हस्तक्षेप करून घनसावंगी पंचायत समितीतील या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करून लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments