Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मत्स्योदरी महाविद्यालय अंबड येथे जिल्हा युवा महोत्सव २०२५ – ७०० हुन अधिक विद्यार्थ्यांची कला सादरीकरणाची मेजवानी

 


अंबड वार्ता प्रतिनिधीआकाश जळके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्हा युवा महोत्सव – २०२५ चे भव्य आयोजन दि. १५ व १६ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे.

📌 २५ पेक्षा जास्त कला प्रकारांचे सादरीकरण

या दोन दिवसीय महोत्सवात भारतीय शास्त्रीय तालवाद्य, एकांकिका, नकला, नाट्यसंगीत, पाश्चात्य सूगम गायन, प्रश्नमंजुषा, प्रहसन, भारतीय शास्त्रीय गायन, नृत्य, समूह गायन, मुकाभिनय, रांगोळी, लोक व आदिवासी नृत्य, वाद्यवृंद, वक्तृत्व, वादविवाद, सूरवाद्य अशा एकूण २५ कलाप्रकारांमध्ये स्पर्धा रंगणार आहेत.

📌 जिल्ह्यातील १०२ महाविद्यालयांचा सहभाग

जालना जिल्ह्यातील तब्बल १०२ महाविद्यालयांनी नावनोंदणी केली असून सुमारे ७०० विद्यार्थी-विद्यार्थिनी या महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत.

📌 उद्घाटन व प्रमुख पाहुणे

या महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू प्रो. डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी मा. राजेश टोपे (अध्यक्ष, मत्स्योदरी शिक्षण संस्था) राहणार आहेत. प्रमुख पाहुण्यांमध्ये सिनेगीतकार डॉ. विनायक पवार, प्राचार्य डॉ. भारत खंदारे, डॉ. बी. आर. गायकवाड, डॉ. भागवतराव कटारे यांचा समावेश आहे.

📌 समारोप समारंभ

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मनिषाताई टोपे (सचिव, मत्स्योदरी शिक्षण संस्था, जालना) राहतील. प्रमुख अतिथी म्हणून सिनेअभिनेत्री वैशाली दाभाडे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, तसेच मा. श्री. उत्तममामा पवार, श्री. राहुल भालेकर, डॉ. राजेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

📌 आवाहन

या महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments