अपघातात चार ते पाच जण गंभीर जखमी
अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जालना (प्रतिनिधी) :आज दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता समृद्धी महामार्गावरील चैनल क्रमांक ३५१/४०० नागपूर कॉरिडॉर, कडवंची शिवार येथे एक भीषण अपघात घडला.
पुण्याकडून नागपूरकडे जात असलेली लक्झरी ट्रॅव्हल्स (क्र. BR 06 PG 5581) समोरच्या वाहनास पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच महामार्गावर ड्युटीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल पी. डी. राठोड, पोलीस अंमलदार गवई (बकल नं. ८२५), महामार्ग पोलीस केंद्र जालना, तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे दोन जवान, क्यूआरयू टीम व समृद्धी अॅम्बुलन्स पथक घटनास्थळी दाखल झाले.
अपघातग्रस्तांना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढून तात्काळ ॲम्बुलन्समार्फत उपचाराकरिता शासकीय दवाखान्यात रवाना करण्यात आले. दरम्यान, महामार्गावरील थांबलेली वाहतूक सुरळीत करून मदतकार्य करण्यात आले.




Post a Comment
0 Comments