अंबड वार्ता प्रतिनिधी घनसांवगी
जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत पटकाविली सहा पुरस्कार: जालना जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मॉडेल कॉलेज घनसावंगी ला प्राप्त.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व लालबहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालय परतुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेमध्ये मॉडेल कॉलेज घनसावंगी आविष्कार स्पर्धेत तब्बल सहा पारितोषिक मिळाले. ग्रामीण घनसावंगी तालुक्यात प्रतिभाशाली विद्यार्थी आहेत याचा परिचय या स्पर्धेत पुन्हा एकदा दाखवून दिला खरंच हे यश नव संशोधक नव नव वैज्ञानिक होण्याची स्वप्न पाहणारी आमचे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाचा सन्मान आहे. पुन्हा एकदा त्यांनी या जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत सहा पुरस्कार पटकावित महाविद्यालयाचा मान सन्मान उंचावला आहे.
महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. सतीश जी दांडगे सर व अविष्कार चे महाविद्यालयीन समन्वयक प्रा. बाळासाहेब वरखडे यांच्या मार्गदर्शनाने, इंजीनियरिंग अंतर्गत कु. अश्विनी उगले प्रथम क्रमांक,संघरक्षक अवार्ड द्वितीय क्रमांक, फार्मसी व मेडिसिन अंतर्गत कु. करुणा पाईकराव प्रथम क्रमांक,
सिद्धिका देशमुख द्वितीय क्रमांक, खुशी गायकवाड तृतीय क्रमांक, अग्रिकल्चरल अंतर्गत काजी अथर द्वितीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरचे सन्माननीय कुलगुरू प्रोफेसर डॉ विजय जी फुलारी सर,प्राचार्य डॉ सतीश जी दांडगे सर आविष्कार समितीचे सर्व सदस्य व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments