जालना :
सद्गुरु श्री वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र भांडुप यांच्या वतीने आज जालना पोलीस हेडक्वार्टर येथे “तणावमुक्त जीवन व व्यवस्थापन” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात सद्गुरु श्री वामनराव पै यांचे शिष्य श्री दशरथ शिरसाठ यांनी पोलीस बांधवांना मार्गदर्शन केले. तणाव कसा कमी करावा, व्यसनमुक्त आरोग्यदायी जीवनशैली कशी स्वीकारावी, कुटुंब-समाज-नोकरीतील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडताना मानसिक व शारीरिक संतुलन कसे साधावे आणि राष्ट्रहित कसे जपावे या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर त्यांनी मोलाचे विचार मांडले.
या व्याख्यानाला पोलीस मुख्यालयाचे प्रमुख माननीय भाऊसाहेब वाघ (अधीक्षक, पोलीस जालना) तसेच निकाळजे सर उपस्थित राहून विशेष सहकार्य केले. यावेळी उत्तम व्यवस्था, पोलीस अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जीवनविद्या मिशनकडून दिलेल्या सकारात्मक मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जीवन विद्या मिशन संस्थेचे आभार मानण्यात आले.
Post a Comment
0 Comments