Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बापाने स्वतः च्या मुलीचा गळा दाबुन केला खुन, गळफास घेतल्याचा केला बनाव.

 

दि 05/9/2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे पोलीस ठाणे बदनापूर हे नाईट गस्त दरम्यान पोस्टे बदनापूर हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की दावलवाडी गावांमधील हरी बाबुराव जोगदंड यांचे मुलीने गळफास घेतला आहे अशा माहितीवरून पोउपनि संतोष कुकलारे हे पोलीस स्टाफ सह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना दिसून आले की, सदर मुलीने आत्महत्या केली नसून काहीतरी घातपात झाला आहे, यावरून एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन बदनापूर यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन खोलात जाऊन तपास केला असता, मुलीने इच्चे विरुद्ध एका मुला सोबत प्रेमप्रकर असल्याने त्याचा अपमान सर्व समाजात झाल्याने बापानेच स्वतः चे मुलीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे, आणि खून पचवणे साठी तिचे गळ्याला दोरी बांधून लोखंडी अंगल याला लटकवले होते, सदर मुलीचे प्रेत बदनापूर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जाऊन त्याची पीएम केले असता त्यामध्ये मुलीचे गळा दाबून खून केल्याचे दिसून आले पोलीस निरीक्षक सुरवसे यानी प्राथमिक चौकशी केली असता सदर मुलीचे वडील हरी बाबुराव जोगदंड यांनी मुलीच्या प्रेम प्रकरणातून सदर मुलीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले लगेच आरोपीस ताब्यात घेउन पोस्ट बदनापूर येथे खुणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास एपीआय करेवार मॅडम हया करत आहेत. 

           सदरची कारवाई ही मा. श्री. अजय कुमार बन्सल, पोलिस अधीक्षक साहेब जालना, मा. श्री. आयूष नोपानी, अप्पर पोलिस अधीक्षक साहेब याचे मारगदर्शन खाली एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन बदनापूर, 

सपोनी/ स्नेहा कारेवांड 

सपोनी/ अविनाश राठोड, 

पो उप नि/संतोष कुकलारे, 

पोक/ आधार भिसे, 

पोक/ दीपक कराढ

पोक/विकास घाडगे

पोक/ पूनंसिंग गोलवाल 

पो का/ एस. जे. तडवी

पो का/ पिल्लेवाड.

पो कॉ/ सानप यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments