जालना : कडबी मंडी सिंधी बाजार येथे स्थापन झालेल्या श्री युवा क्रांती गणेश मंडळ, जालना येथे गणेशोत्सवाच्या उत्साहात अंबड वार्ता चे संपादक बळीराम राऊत यांच्या हस्ते श्री गणरायांची आरती करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-झांजांच्या निनादात संपूर्ण मंडप भक्तीभावाने भारावून गेला आणि वातावरणात अपार श्रद्धा व ऊर्जा संचारली.
या प्रसंगी सुनील पैलवान, रूपाजी पैलवान, खैरे, भरत भैया भगत, विद्यासागर श्री माळी, अमरसिंह राजपूत, इनुस खा पठाण, महेश कोडम, मयूर राजपूत, राजेश देव आले, जगन राजपूत, अशोक राजपूत, पापा ठाकूर, रवी खुणे यांच्यासह व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री युवा क्रांती गणेश मंडळ हे सामाजिक बांधिलकी व एकात्मतेच्या कार्यासाठी ओळखले जाते. या जोशपूर्ण आरतीमुळे “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात संपूर्ण कडबी मंडी परिसर भक्तिमय झाला.


Post a Comment
0 Comments