Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

घुंगर्डे हादगाव: मत्स्योदरी विद्यालयात अंकुशराव टोपे जयंती साजरी

 



बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव 


मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकारमहर्षी व शिक्षण महर्षी,कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब यांची जयंती सप्ताह निमित्ताने मत्स्योदरी विद्यालय घुंगर्डे हदगाव येथे बालसभा कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब यांचे जीवन कार्य या विषयावर संपन्न झाली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मयोगी. अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.या बालसभेत कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेब यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.तसेच काही विद्यार्थ्यांनी कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या कार्यक्रम प्रसंगी आजच्या बालसभेचे अध्यक्ष म्हणून इयत्ता आठवी ची विद्यार्थीनि शिवानी आमटे होती. तसेच विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने साहेबांचे शैक्षणिक कार्य सहकार क्षेत्रातील कामे,सामाजिक कामे विद्यार्थ्यांना सांगितले.या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.कल्याण सोळुंके सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.कोटंबे व श्री पटेकर यांनी केले. आभार प्रदर्शन अक्षरा शेंडगे हिने केले.

Post a Comment

0 Comments