Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मत्स्योदरी विद्यालय घुंगर्डे हदगाव येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न

 


बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव 

आज दि .24 सप्टेंबर 2025 बुधवार रोजी शाळेत शिक्षण व सहकार महर्षी श्री.अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या जयंती सप्ताह निमित्त शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.सोळुंके सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.त्यात 5वी ते 10वी गटाची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सोळुंके सर होते. तर परीक्षक म्हणून श्री.बांगर सर व श्री.लांडगे सर यांनी काम पाहिले..सूत्रसंचलन वर्ग 10वी ची विद्यार्थिनी कु. दीक्षा भद्रे व कु.अंजली काळे यांनी केले,या कार्यक्रमास सर्व शिक्षक,शिक्षिका विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला..

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री कल्याण सोळुंके, शिक्षक वृंद श्री. बांगर,श्री येटाळे ,श्री. कोटंबे,श्री.शेख,श्री.पवार,श्री. गुरव,श्री.वाघमारे,श्री.लांडगे,श्री. खराद,श्री. नांद्रे,श्री. काथार,व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार प्रकट करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Post a Comment

0 Comments