अबंड वार्ता, घनसावंगी (तालुका प्रतिनिधी – काकासाहेब कासार)
जालना जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवणारी अभिमानाची बातमी! स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संत रामदास महाविद्यालय शहागड यांना महाराष्ट्र शासनाने औषध निर्माण शास्त्र (फार्मसी) महाविद्यालय सुरू करण्यास अंतिम मान्यता दिली आहे. शासनाचा जीआर नुकताच प्रसिद्ध झाला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही ऐतिहासिक घटना ठरली आहे.
या मान्यतेमुळे अंबड व घनसावंगी तालुक्यातील मुला-मुलींना आता गावाजवळच डी.फार्मसी व बी.फार्मसी अभ्यासक्रम उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे फार्मसी क्षेत्रातील शिक्षणाचे स्वप्न साकार होणार आहे. या अभ्यासक्रमाची सुरुवात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून होणार आहे.
संत रामदास महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारीवर्गाने मागील अकरा महिन्यांपासून शासन दरबारी निकष पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून अथक मेहनत घेतली. अखेर त्यांच्या परिश्रमांना यश आले असून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शिवाजीराव चोथे साहेब व संस्थेचे सचिव माननीय विनायक भैय्या चोथे साहेब यांनी सर्व कर्मचारीवर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
👉 ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून जालना जिल्ह्यातील शिक्षणाच्या प्रगतीत हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments