अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
अंबड: येथील श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश शाळेच्या मुकेश पांढरे ९२किलो वजनी गटात प्रथम,अभय वैराळ ५१ वजनी गटात प्रथम, शोहेब शेख ८७ किलो वजनी गटात प्रथम, कोमल ज-हाड ७६ किलो वजनी गटात प्रथम, स्नेहल गोहाडे ६७ किलो वजनी गटात प्रथम व शिवराज येवले ५५ किलो वजनी गटात प्रथम अशा प्रकारे मुले व मुलींच्या कुस्ती स्पर्धेत भारडी येथे झालेल्या पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत कुस्ती संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे. या विजयी संघाचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह शाळेचे अध्यक्ष डॉ .प्रवीणकुमार कासलीवाल डॉ. रमेशचंद्र गंगवाल, शिरीष सावजी, प्रवीण बाकलीवाल, संजय चांदीवाल, सुरेश दिडपोळे, राजेंद्र काला, डॉ. नरेश अग्रवाल, डॉ.संतोष मोहळे, चंद्रप्रभू दिडपोळे, संजय इंचूरे, मुकेश सावजी, संतोष बाकलीवाल, दिपक पाटणी, भूषण काला, डॉ. अनिल पांडे, दिलीप बुर्ले तसेच शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर भारद्वाज,क्रीडा शिक्षक नागेश वराडे, हरिश्चंद्र जरांगे, सौ.आराधना मुंगीकर यांच्यासह सर्व शिक्षक, पालक यांनी विजय संघाचे अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments