बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील आशा वर्कर अश्विनी शिंदे यांना लहान मुलांची व वृद्ध महिलांची काळजी व माहिती घेण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो. सध्या परिसरात खूप पाऊस असल्यामुळे या आशा वर्कर यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तुटपुंजी मानधनावर काम करणाऱ्या या आशा वर्कर यांना तांडा वस्ती येथे जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. लहान मुलांची तपासणी असो, गरोदर मातांची तपासणी करण्यासाठी अहोरात्र या आशा वर्कर काम करत आहेत अशा परिस्थितीतही त्या हार मानत नाही.

Post a Comment
0 Comments