Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

“ही लक्झरी नाही... सरळसरळ लूट आहे!”

 



🚌 एसटीच्या नावाखाली गेवराई आगाराकडून प्रवाशांची उघड लूटबाजी!


अंबड वार्ता(प्रतिनिधी): आकाश जळके 


“जिथं सरकारच्या गाडीत प्रवास करणं सुरक्षित वाटायचं, तिथंच आता प्रवाशांना ‘भंगार लक्झरी’ दाखवून लूटलं जातंय!” – गेवराई आगाराच्या स्लीपर कोच बसमधून (MH 09 F L – 0542) प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हा आक्रोश.


सोमवारी जालना-गेवराई मार्गावर घडलेला प्रकार ऐकल्यावर प्रत्येकाच्याच अंगावर शहारे येतात. अंबडचे तिकीट भाडे ५१ रुपये असताना प्रवाशाकडून थेट ६९ रुपये वसूल करण्यात आले.


प्रवाशाने विचारलं –

👉 “हे भाडं एवढं जास्त का?”

त्यावर खडसावणारा आवाज –

👉 “ही स्लीपर कोच आहे, एवढंच भाडं आहे!”


पण प्रत्यक्षात स्लीपर कोच म्हणजे...


*प्रत्येक सीटवर धुळीचे ढीग – झटकली की धुरळा!


शयन सीटला कुशनच नाही – थेट हाड मोडणारं बेड!


खिडक्या तुटलेल्या, काही उघड्याच – पावसाचं पाणी थेट चेहऱ्यावर.


ए.सी. नावालाच नाही, तरीही प्रवाशांच्या खिशावर डल्ला.*



एक प्रवासी संतापून म्हणाला –

👉 “हे लक्झरी नाही, ही तर आमच्या पैशांची सरळसरळ लूट आहे!”


दुसरा प्रवासी हसतच म्हणाला –

👉 “बसची अवस्था अशी की, भंगार विक्रेत्यांनीही हात लावला नसता. पण भाडं मात्र मुंबई-दिल्ली फ्लाइटसारखं!”


🚨 जनतेचा संताप


सामान्य जनता मेहनतीनं मिळवलेले पैसे सरकारच्या गाडीत सुरक्षित जातील म्हणून एसटीने प्रवास करते. पण आता एसटीही लुटायला लागली तर...

👉 “मग विश्वास ठेवायचा तरी कुणावर?” असा सवाल प्रवाशांनी केला आहे.


📢 थेट इशारा


प्रवाशांची स्पष्ट मागणी –

“गेवराई आगार प्रमुखांनी तात्काळ ही लूट थांबवावी. अन्यथा प्रवाशांचा संताप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.”

Post a Comment

0 Comments