Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कुंभार पिंपळगाव मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप, व्यापारी अडचणीतव्यापाऱ्यांनी रात्रभर जागून दुकाने जपली

 


 पारणेर / प्रतिनिधी 


 मंगळवारी कुंभार पिंपळगावचा परिसरात मुसळधार पावसामुळे बाजारपेठेचा मुख्य रस्ताला नदीचे स्वरूप आले होते ज्यामुळे स्थानिक नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. फुलाचे काम अपूर्ण असल्याने नदी नाल्याचे पाणी रस्त्यावर रस्त्यावर आले, ज्यामुळे रस्त्यावर चालणे कठीण झाले होते.काहीं व्यापाऱ्यांनी सांगितले की पावसामुळे त्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. यामुळे व्यापारी रात्रभर जागे राहून त्यांच्या दुकानांची काळजी घेत आहेत.रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. ही समस्या सोडवली नाही तर त्यांना मोठा त्रास सहन करावा लागेल असे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे.

कुंभार पिंपळगावच्या व्यापार आणि व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी करत आहे की रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलावीत. रस्त्यावर पाणी साचल्याने व्यापाऱ्यांना व नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे.

Post a Comment

0 Comments