Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वाघलखेडा–शेवगा रस्ता पाण्याखाली; शेतकरी बांधवांचा आक्रोश उसळला!

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

वाघलखेडा प्रतिनिधी – वाघलखेडा ते शेवगा हा दळणवळणाचा महत्वाचा रस्ता पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्ग पूर्णपणे त्रस्त झाले आहेत. सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असताना शेतकरी बांधवांना शेतात ये-जा करण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने महिला, शेतकरी, विद्यार्थी यांचे हाल झाले आहेत. कपाशीचे आधीच मोठे नुकसान झाले असून आता शेतात उभे असलेले सोयाबीनसुद्धा वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश वाढला आहे.


गावकऱ्यांनी या संदर्भात निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, "तातडीने रस्ता मोकळा करून दिला नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत," असा इशारा दिला आहे. इतकेच नव्हे तर शेतीचे नुकसान अधिक झाले तर आत्मदहनाची परवानगी द्यावी, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


सदर निवेदनावर पुढील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या सह्या आहेत –


रामकिसन बापुराव घुगे, कनाथ भानुदास, बळीराम लाभ नागर, जनाथन प्रल्हाद नागरे, बाराप नागरे, सुरेश आंबादास घुगे, भानुदास रामभाऊ नागरे, जितेंद्र पाडुरंग नागरे, श्रीराम बाबासाहेब नागरे, जनान्धन बबन नागरे, चंद्रकोल किसन नागरे, आशोक भगवान नागरे, शाइनाथ आना नागरे, रमेश चक्रकांत नागरे, वैजिनाथ काल नागरे, भगवान गोविंदराव घुगे, विकर काशीनाथ नागरे, भारत रामभाऊ भेडे, विठ्ठल कक्षा मोरे, कडुबा दामोधर मेडे, भागीरथ कटुबा नागरे, नाथा रामभाऊ नागरे, पीरंग रामभाऊ नागरे, किसन पंडित घुगे, जालिंदर आसाराम दाहको, लक्ष्मण दामु मेरे, आमोल भानुदास नांगरे, आमाल नागा, चंद्रकांत नागरे, आशोक नागरे, वेमेश नागरे, वैजिनाथ नागरे, भगवान धुने, विबुद्ध नागरे, विठ्ठल किसन, जालींदर पहिले, गीताराम वाजीराव मोरे इत्यादी शेतकरी बांधवांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments