Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मॉडेल कॉलेज, घनसावंगी येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिन उत्साहात साजरा.






 अबंड वार्ता घनसावंगी तालूका प्रतिनिधी काकासाहेब कासार.

२४ सप्टेंबर २०२५ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छञपती संभाजीनगर चे घटक महाविद्यालय मॉडेल कॉलेज, घनसावंगी येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिन विशेष उत्साह आणि समर्पणाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्राध्यापक डॉ. रुशिबाबा शिंदे उपस्थित होते, ज्यांनी आपल्या प्रेरक भाषणातून स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. सोबतच, प्रमुख वक्ते प्राध्यापक उदय पवार यांनीही स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमात *"स्वच्छता ही सेवा"* आणि *"नॉट मी बट यू"* या घोषवाक्यांखाली विविध उपक्रम राबवण्यात आले. स्वच्छता, समाजसेवा आणि एकता यावर भर देणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.


प्राचार्य डॉ. सतीश दांडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. (डॉ.)भीमराव पुंडगे सर, तर कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा.के.एम. नवखंडे, प्रा.बी.डी. गोरे, प्रा.डी.ई. खोजे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली यावेळी प्रा.सुधीरकुमार राठोड, प्रा.(डॉ.) जया बागुल मॅडम, गणेश सुरासे आणि इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थिनी जयश्री दाते यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी पायल सावंत यांनी केले, तर सर्व NSS स्वयंसेवकांनीही या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.


या कार्यक्रमाद्वारे स्वच्छता आणि समाजसेवेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आले या कार्यक्रमाचा समारोप वृक्षारोपण कार्यक्रम व परिसर स्वच्छतेने करण्यात आला. अशाच प्रकारे पुढेही समाजसेवेच्या कार्यात सहभागी होत राहण्याचे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments