Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गल्हाटी मध्यम प्रकल्पाचे जलपुजन

 


घुंगर्डे हादगाव ( प्रतिनिधी) : 

 अंबड तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या गल्हाटी मध्य प्रकल्प १०० टक्के भरल्याने गल्हाटी धरण संघर्ष समितीच्या वतीने जलपुजन करण्यात आले. 

  अंबड तालुक्यातील बारसवाडा येथे गल्हाटी मध्य प्रकल्प आहे. या ठिकाणी गुरुवार रोजी गल्हाटी धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष राधाकिसन मैंद, उपाध्यक्ष पांडुरंग गटकळ, सचिव तथा वसंतनगरचे सरपंच अशोक जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,प्रगतिशील शेतकरी राजेंद्र साळुंखे, गणेश जोशी,बाबासाहेब गायकवाड, पत्रकार अशोक गायकवाड, राजेंद्र निंबाळकर,सतिश माने, नवनाथ माळी,सुरेश बरडे यांच्या हस्ते धरणात श्रीफळ वाहून जलपूजन करण्यात आले.

   गल्हाटी धरणात गोदावरी नदी हुन उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून सतत कोरडा असलेल्या या प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी गल्हाटी धरण संघर्ष समितीच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून करण्यात येत होती. या मागणीसाठी रास्ता रोको,आंदोलने करण्यात आली होती.याबाबत मोठा लढा ही उभारण्यात आला होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या चालढकल पणामुळे ही योजना पूर्णत्वास न जाता फक्त कागदावरच राहिली. 

  जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची अनास्था व लोकप्रतिनिधी नी कितीही दुर्लक्ष केले तरी ही वरुणराजा ने मात्र या वर्षी बळीराजावर चांगली कृपादृष्टी ठेवल्याने पाऊस चांगला झाला आणि गल्हाटी धरण शंभर टक्के भरले.

     राजकीय अनास्थेमुळे गल्हाटी मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजनेने जरी भरला नसला तरी वरुणराजा च्या कृपेने भरला आहे.अनेक वर्षांपासून कोरड्या पडलेल्या या प्रकल्पात पूर्ण भरल्याने निसर्ग देवतेचे व वरूनराजाचे आभार मानण्यासाठी गल्हाटी धरण संघर्ष समितीच्या वतीने जलपूजन करण्यात येत असल्याचे समितीचे सदस्य तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितले आहे.‌‌

Post a Comment

0 Comments