Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

“शिस्तभंग सहन नाही; नवरात्र महोत्सवात पाकीटमार, टवाळखोरांसाठी टाकी तयार – पोलीस प्रशासन”

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत प्रशासनाने कडक निर्देश दिले. “महोत्सवात कोणत्याही प्रकारची गडबड, शिस्तभंग किंवा अव्यवस्था सहन केली जाणार नाही” अशा स्ट्रीक शब्दांत तहसीलदार विजय चव्हाण यांनी स्पष्ट केले.


🚨 कडक आदेश:


“एमएससीबीचे कर्मचारी २४ तास कार्यरत हवेत, कुठल्याही नागरिकाचा कॉल दुर्लक्षित होऊ नये” असा सडेतोड आदेश तहसीलदारांनी दिला.


लाईट गेली नाही पाहिजे, त्यासाठी खास दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी वीज विभागाला दिले.


देवी संस्थानच्या वाढत्या खर्चावर उपाय म्हणून पुढील काही दिवसांत सोलार बॅनर बसवून खर्च नियंत्रणात आणणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.



👮 पीआय संतोष घोडके यांचा दमदार इशारा:

अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी ठणकावून सांगितले –

“पाकीटमार, गावगुंड, टवाळखोर जर नवरात्र उत्सवात कुणाला छळण्याचा किंवा गडबड करण्याचा प्रयत्न केला, तर गाठ माझ्याशी! पार्किंगमध्ये गाड्या अस्ताव्यस्त लावल्या, तर टेंडर रद्द करण्यात येईल. शिस्त मोडणाऱ्याला पोलिसांची ‘टाकी’ तयार आहे.”


🌸 व्यवस्थापन ठरले लोभसवाणे:


पार्किंगसाठी कडक नियम, सीसीटीव्ही नजर.


देवी संस्थानतर्फे स्वच्छतेसाठी १५ जणांचा स्टाफ नेमणूक.


दरवर्षीप्रमाणे आयटीआय कॉलेजचे ७५ स्वयंसेवक कार्यरत.


स्वयंसेवकांसाठी नाश्ता व आरोग्याची संपूर्ण सोय प्रशासनाकडून.


भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अंबड वार्ता तर्फे ॲम्बुलन्सची व्यवस्था.


नगरपालिका फायर ब्रिगेडची गाडी २४ तास परिसरात कार्यरत.


ऐतिहासिक किल्ल्याच्या स्वरूपात भव्य लॉन्स, वृक्षारोपणातून पर्यावरणपूरक वातावरण.



कार्यक्रमानंतर तहसीलदार विजय चव्हाण व पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी प्रत्यक्ष स्पॉट पाहणी करून म

होत्सवाच्या तयारीचे निरीक्षण केले.


Post a Comment

0 Comments