Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

टाका येथे इकोझेन कंपनीच्या सोलार युनिटचे मोठे नुकसान

 


  घुंगर्डे हादगाव / प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात १३ सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.टाका येथील गट क्रमांक १७४ मध्ये शेतकरी लक्ष्मण आबासाहेब गायकवाड यांच्या शेतीत बसविण्यात आलेल्या इकोझेन कंपनीच्या सोलार युनिट्सचे मोठे नुकसान झाले.


अचानक आलेल्या वादळ व मुसळधार पावसामुळे सोलार पॅनेल्स पूर्णपणे उध्वस्त झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा झाला आहे.गायकवाड यांनी सांगितले की,हे सोलार युनिट्स शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी बसविण्यात आले होते.परंतु आता पॅनेल्सचे नुकसान झाल्यामुळे शेतीला पाणीपुरवठा करणेही कठीण होणार आहे.


या नुकसानीबाबत शेतकरी गायकवाड यांनी इकोझेन कंपनीकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.कंपनीने शेतकऱ्यांचे नुकसान तातडीने भरून द्यावे,अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनानेही मदत करावी,अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे.वादळी पावसामुळे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांच्या समस्या आणखी वाढल्या असून,शासन व संबंधित कंपनीने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.

Post a Comment

0 Comments