बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यात सततच्या पावसामुळे 3 मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आज श्री.सतिश घाटगे साहेब यांनी अंबड तालुक्यातील नुकसानीची शेतकऱ्यांसोबत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत तहसीलदार विजय चव्हाण यांना संपर्क करून तातडीने पंचनामे करण्यास सांगितले.
निसर्गाच्या संकटामुळे झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांनी खचून न जाता, उभारी घेणे हीच खरी जिद्द आहे. प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून हक्काची भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देऊ, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला.

Post a Comment
0 Comments