Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

झिरपीत नवरात्र उत्सवाला वीस वर्षांची परंपरा – दुर्गामातेच्या गजरात गावात उत्साहाचा जल्लोष

 


अंबड (प्रतिनिधी):

अंबड तालुक्यातील झिरपी गावात गेल्या वीस वर्षांपासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून यंदाही दुर्गामातेची स्थापना भव्य दिमाखात करण्यात येणार आहे.

या उत्सवाची परंपरा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष राहुल हमने यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दशकांपासून सुरु आहे. नवरात्रोत्सवाच्या आगमनदिनी गावातून भव्य रॅली काढण्यात येते तसेच नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

दरवर्षी या उत्सवाला जिल्हाभरातून मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे, सतीश भाऊ टोपे, सतीश दादा होंडे, मनोज काका मरकड, संजयजी काळबांडे, निसारजी देशमुख, नंदकुमार देशमुख, बबलूजी चौधरी, गावचे सरपंच व गावकरी मंडळी असे मान्यवर या कार्यक्रमासाठी नियमितपणे उपस्थित राहतात.

नवरात्राच्या प्रत्येक दिवशी दुर्गामातेच्या आरतीसाठी मान्यवर हजेरी लावतात. गावकरी मंडळी उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतात आणि गावात नऊ दिवस आनंदीमय वातावरण निर्माण होते.

या उत्सवाचे मुख्य आयोजक राहुल भास्करराव हमने असून गेल्या वीस वर्षांपासून त्यांच्या प्रयत्नातून झिरपी गावात दुर्गामातेची भव्य स्थापना होत आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे ही परंपरा आजही कायम असून पुढील अनेक वर्षे ती अधिक जोशात सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments