Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

“गुरूंच्या चरणी भक्तीचा महासागर – सुरांच्या लहरींनी भारावली अंबड नगरी”




अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 


 महात्मा फुले चौक अंबड येथे आज संध्याकाळी नाथभक्तीच्या सुरावटींनी अख्खा अंबड नगरी भारावून गेला. गुरुवर्य गोकुळनाथ जी महाराज यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नाथभक्ती गीतांचा कार्यक्रम भाविक भक्तांसाठी अविस्मरणीय ठरला.

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक व नाथभक्त आकाश भाऊ शिंदे यांच्या सुरेल आवाजात नाथभक्ती गीतांचा प्रवाह जेव्हा दुमदुमला, तेव्हा अंबडची जनता क्षणभरासाठी आध्यात्मिक रंगभूमीवर घेऊन गेली. एकेका गीतात दडलेले अध्यात्मिक तत्त्वज्ञान, भजन-कीर्तनाचा ओघ आणि भक्तीभावनेने भरलेला दरवळ यामुळे संपूर्ण परिसराला जणू नवी ऊर्जा प्राप्त झाली.

गुरू-शिष्य परंपरेचा पवित्र बंध

गुरुवर्य गोकुळनाथ जी महाराजांच्या चरणी अर्पण झालेला हा सोहळा केवळ गाण्यांचा कार्यक्रम नव्हता, तर गुरू-शिष्यांच्या नात्याची जिव्हाळ्याची आठवण करून देणारा अध्यात्मिक मेळावा होता. “नाथांचा मार्ग म्हणजे साधेपणा, सेवाभाव आणि अध्यात्मिक समर्पण” या संदेशाला सूरांच्या माध्यमातून जीवंत रूप मिळाले.

कार्यक्रमादरम्यान अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले, हात आपोआप जोडले गेले आणि भक्तीचा महासागर महात्मा फुले चौकात दाटून आल्याचे दृश्य अनुभवास आले.

आयोजकांचे प्रयत्न कौतुकास्पद

नाथभक्त परिवार, महाकाल सेना, जय स्वयंभू ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने अंबडमध्ये भक्ती, अध्यात्म व संस्कारांचा अनोखा संगम घडवून आणला.

“संगीताच्या सुरांनी भारलेला आणि भक्तीभावनेच्या छटांनी रंगलेला हा सोहळा अंबडच्या जनतेसाठी आयुष्यभर स्मरणात राहील”, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments