₹13 लाख 26 हजार 300 किमतीचा मुद्देमाल जप्त – 9 जुगारी अटकेत
अंबड (प्रतिनिधी). आकाश जळके
अवैध जुगार व्यवसायावर अंबड पोलीसांनी मोठा धाडसी छापा टाकत शहरात खळबळ उडवून दिली आहे. मा. अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक जालना व मा. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक जालना यांच्या आदेशान्वये विशेष पथकाने ही कारवाई केली. या छाप्यातून तब्बल ₹13,26,300/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 9 इसमांना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीवरून छापा
दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता व्यंकटेश नगर, पंढरी पार्क समोरील बांधकाम सुरू असलेल्या घरात काही जण गोल बसून जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मा. आयुष नोपाणी यांना मिळाली. त्यानुसार रात्री अंदाजे 8 वाजता पथकाने धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच काहीजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, परंतु 9 जणांना ताब्यात घेण्यात यश आले.
जप्त मुद्देमाल
रोख रक्कम – ₹59,300/-
मोबाईल 8 नग – ₹59,000/-
चारचाकी वाहने 2 – ₹9,50,000/-
दुचाकी वाहने 4 – ₹2,58,000/-
एकूण – ₹13,26,300/-
अटकेत आलेले आरोपी
सुनिल तावणराय गोल्टे (44, चिंचखेड), प्रभू रामभाऊ शिराळे (32, चांगले नगर), सखाराम शामराव शिराळे (38, चांगले नगर), सचिन लक्ष्मण मोमीन (23, गेवराई/चांगले नगर), मोहसिन समद तांबोळे (34, शहागड), राजु अण्णासाहेब चिमणे (41, तिर्थपुरी), दिलीप रोहीदास राठोड (42, राहुवाडी), शेख अस्लम शेख ईसार (45, नाईकवाडी मोहल्ला अंबड), गणेश निवृत्ती बोबडे (40, बिड/सावता माळी चौक).
कारवाई करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी
या धाडसी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पो.कां. निखिल गायकवाड, पो.कॉ. उत्ताप सुंदडे, पो.कॉ. विशाल साळुंके, सपोनि गुरले, पोका मुंडे व इतर कर्मचारी सहभागी होते.
या कारवाईमुळे अंबड शहर व परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत असून अवैध धंदे थांबविण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद ठरत आहे.

Post a Comment
0 Comments