अंबड । प्रतिनिधी गणेश पाटील शेरे, पारनेर
आज दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी (वार बुधवार) अंबड तालुक्यातील शेवगा व धनगर पिंपरी येथील ग्रामस्थांनी जालना-अंबड रोडवर शेवगा पाटी येथे तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या दोन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून ST आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर समाज बांधव मा. श्री. दिपकराव बोराडे हे दिनांक 17 सप्टेंबरपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक, जालना चौफुली येथे उपोषणास बसले असून, त्यांचे उपोषण तात्काळ सोडवावे, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक रामेश्वर काकड साहेब यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनात धनगर पिंपरी येथील माजी सरपंच रंजीत कचरे, शेवगा येथील सरपंच शंकर गायकवाड, उपसरपंच संकेत खरात, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ तिकांडे, श्रीराम तिकांडे, आशोक पालवे, नारायण बारहाते, कल्याणराव आधे, विकास आधे, आदिलाजे टोंपे, सोनाजी काळे, जनार्दन गावडे, विठ्ठल गावडे, शरद पवार, महाधू गाढे, आशोक आहे, शंकर बारहाते, दत्ता शेळके, रामकृष्ण तुपे, सुरेश शेळके, दत्तात्रय गावडे, विठ्ठल गाढे, अभिषेक पवार, जगन्नाथ टोंपे, शंकर गाढे, भरत गाढे, कृष्णा टोंपे, दिनेश गावडे, परमेश्वर वाघ आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आंदोलन यशस्वी ठरले. 🚩

Post a Comment
0 Comments