Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अवैध पिस्तुलीसह २३ वर्षीय युवक पकडला – बंसल साहेबांच्या सूचनांवर गुन्हे शाखेचे अॅक्शन

 


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके


जालना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी मोठी कारवाई केली.

गुप्त माहितीच्या आधारे प्रविन संतोष तायडे (वय 23, रा. गोकुळवाडी, ता. जालना) यास खरपुडी चौफुली येथील इंडियन ढाबा समोर शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल (अग्नीशस्त्र) व सहा जिवंत काडतुसे आढळून आली. पंचासमक्ष शस्त्र जप्त करण्यात आले असून आरोपीकडून शस्त्र पुरवठा साखळीबाबत चौकशी सुरू आहे.

या प्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि. योगेश उबाळे, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि. राजेंद्र वाघ व स्थागुशाचे अमंलदार गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, प्रभाकर वाघ, भाऊराव गायके, रमेश राठोड, सागर बाविस्कर, सतीष श्रीवास, इरशाद पटेल, रमेश काळे, कैलास चेके, अशोक जाधवर यांनी केली.

Post a Comment

0 Comments