अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जालना : अवैध दारु वाहतूक करणारा वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात, ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त जालना जिल्हा वाहतूक शाखेच्या कारवाईत अवैध दारु वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करण्यात आली. कन्हैयानगर चौफुली येथे प्रलंबित दंड वसुलीसाठी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान MH 03 CB 6947 या ईटिंगा वाहनास थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये विदेशी दारुचे एकूण ९ बॉक्स आढळले. या बॉक्समध्ये तब्बल ४८४ विदेशी दारुच्या बाटल्या असून त्यांची किंमत अंदाजे १ लाख १५ हजार ३२० रुपये इतकी आहे.
वाहन चालकाचे नाव अंकित प्रभाकर वाघ (वय २५ वर्षे, रा. वरुड ता. जाफ्राबाद, जि. जालना) असे असून, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा दारु वाहतुकीचा परवाना नव्हता. अवैध दारुची वाहतूक करत असल्याने वाहनचालकाविरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हिबीशन कायदा व मोटार वाहन कायद्याअंतर्गत पोलीस ठाणे चंदनझिरा येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. सदर कारवाईत विदेशी दारुचे ९ बॉक्स व एक ईटिंगा कार असा एकूण ४ लाख ६५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक जालना मा. अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक जालना मा. आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस ठाणे चंदनझिरा प्रभारी अधिकारी श्री बाळासाहेब पवार, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी सपोनी चंद्रकांत चातुरे तसेच पोहेकों गणेश जाधव, पोहेकों विजय लोखंडे, पोशि राजेश दहिवाळ, पोशि महंमद चौधरी, चापोहेकों गोरखनाथ राठोड, पोशि नवनाथ पाटील आदी पोलीस अंमलदारांचा सक्रिय सहभाग होता.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ठाणे चंदनझिरा यांच्याकडून सुरु आहे.
---

Post a Comment
0 Comments