६ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त – तीन जणांना अटक
जालना (प्रतिनिधी) –
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दोदडगाव शिवारात बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांवर गोंदी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ₹६,०७,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
🔴 गुप्त माहितीवर कारवाई
दिनांक २ सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना गुप्त माहिती मिळाली की दोदडगाव शिवारात अवैधरित्या वाळू साठवणूक व वाहतूक सुरू आहे.
पोलीस उपनिरीक्षक किरण हावले, पो.कॉ. प्रदीप हवाळे व पो.कॉ. गजानन भवरे यांनी तत्काळ छापा टाकला.
तेथे लाल रंगाचा महिंद्रा ५७५ DI SP Plus ट्रॅक्टर (चालक: शाम परमेश्वर जगताप, रा. धाकलगाव) व त्याचे दोन साथीदार मिळून दीड ब्रास वाळू अंदाजे ₹७,५०० किंमतीची चोरीच्या उद्देशाने वाहतूक करताना पकडले.
🛑 आरोपींवर कठोर कारवाई
सदर ट्रॅक्टर व इतर साधनांसह एकूण मुद्देमाल ₹६,०७,५०० जप्त करण्यात आला. तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
👮 वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत एपीआय आशिष खांडेकर, पीएसआय किरण हावले, पो.कॉ. प्रदीप हवाळे व पो.कॉ. गजानन भवरे यांचा सहभाग होता.
या प्रकरणाचा पुढील तपास पो.उप.निरीक्षक किरण हावले करत आहेत.
📢 पोलिसांचे आवाहन
“वाळू चोरीसारख्या अवैध धंद्याविरुद्ध कारवाई सुरूच राहील. नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना कळवावे,” असे आवाहन गोंदी पोलिसांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments