मोतीगव्हाण : “तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” हा दिव्य संदेश देणारे विश्वसंत सद्गुरु श्री. वामनराव पै यांच्या जीवनविद्या तत्त्वज्ञानाचा प्रचार–प्रसार करण्याच्या उद्देशाने भांडुप ज्ञानसाधना केंद्र मुंबईच्या वतीने मोतीगव्हाण येथे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून “मन करा रे प्रसन्ना” या विषयावर मार्गदर्शक प्रबोधक व उद्योगजगताचे प्रख्यात व्यक्तिमत्त्व श्री. दशरथ शिरसाट साहेब (मुंबई) यांचे प्रबोधन होणार आहे.
या प्रसंगी ग्रामस्थ बंधू–भगिनी तसेच भक्तगण यांना अनमोल असे जीवनमार्गदर्शन लाभणार आहे. आपले जीवन अधिक सुखी आणि आनंदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी दवडू नये, असे नम्र आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments