Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पाथ्रीकर कॅम्पस येथे अंतरमहाविद्यालयीन मुलीचे कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन

 


बदनापूर, प्रतिनिधी 

डॉ. बाबासाहेब आबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजीनगर व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाथ्रीकर कॅम्पस बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतरमहाविद्यालयीन कब्बडी (मुली) स्पर्धा दि. 13/9/2025 रोजी महाविद्यालयाच्या ‘इनडोअर हॉल' येथे संपन्न झाल्या सदरील स्पर्धेचे उद्‌घाटन विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष व निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे संस्थापक डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजयभाऊ पाथ्रीकर, डॉ. सोनाली पाथ्रीकर, प्रा. दिगंम्बर तौर, डॉ. नाजमा खान तथा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सचिन देशमुख हे होते. मौलाना आझाद महाविद्यालय संभाजीनगर या मघाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. एम. ए. बारी हे सेवा निवृत्त झाल्याबद्‌दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तर कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू डॉ. मानीक राठोड यांचा विशेष सत्कार करणात आला. तसेच नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी मुलांच्या स्पर्धेत बद‌नापूर संघानी प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सर्व खेळाडूचा सत्कार मान्यवराच्या हस्ते संपन्न झाला.



सदरील स्पर्थेमध्ये विद्यापीठाअंतर्गत असलेल्या छ. संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिव या चार जिल्ह‌यातील आठ संघानी सहभाग घेतला होता. तर अनेक महाविद्यालयातील खेळाडू निवड चाचाणीसाठी उपस्थित होते. सदरील स्पर्धेत अंतीम सामन्यात जालना येथील मत्योदरी शारिरिक शिक्षण महाविद्यालयाचा संघ प्रथम आला. तर S.P.P.M. महाविद्यालय, सिरसाळा जि. बीड येथीक संघ दितीय ठरला आहे. या संघांना मेडल, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश (भैय्या) पाथ्रीकर, डॉ. नाजमा खान हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव डॉ. सौ.एम. डी. पाथ्रीकार या होत्या. स्पर्धा यशस्वी कराण्यांसाठी पंच म्हणून श्री. राजू‌भाऊ थोरात, श्री. संतोष नागवे, श्री नाना पाटोळे, तुकाराम दौड, शंकर भंडारे, डॉ. मानीक राठोड, डॉ. लक्ष्मण जाधव, डॉ. भूजंग डावकर, डॉ. बप्पासाहेब मस्के यांनी काम पाहीले. यावेळी विद्यापीठाचा संघ निवडण्यात आला. विद्यापीठ निवड समिती सदस्य म्हणून डॉ. मनीषा पवार, डॉ. राणी पवार, डौ. सारीका जगताप व भीमा माने यांनी काम पाहिले. उत्कृष्ठ वीस खेळाडूची या वेळी निवड विद्यापीठाच्या संघासाठी प्रथम स्वरुपात करण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक, विद्यापीठाचे माजी अधिष्टाता डॉ. एस.एस. शेख, डॉ. हरून कुरेशी, डॉ. नाजमा खान, प्र. प्राचार्य डॉ. जाकेर पठाण, डॉ.मुंगे, डॉ. राजळे, डॉ. निहाल, डॉ. चोपकर, डॉ. जिवनज्योती निकाळजे, डॉ. सलमा शेख, डॉ.बुरांडे, श्रीमती देशमुख, डॉ. गावंडे, श्री. नंदकिशोर नाईक्वाडे, श्रीमती धुमाळ, मनोज गजर, शिवाजी चव्हान, सचिन कळवत्रे, रवी खांडेभराड, डॉ. बुरांडे, डॉ. आबेद शेख यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

 कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. शफी शेख, डॉ. डी.डी. देशमुख, प्रा. गीतेश व्यास यांनी केले. तर प्रास्तविक डॉ. एस. एस. शेख यांनी तर आभार प्रा. श्रीनिवास मुंगे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments