Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शहरातील महामार्गावरील पथदिवे एक वर्षानंतरही बंद या दिवाळीचा मुहूर्त कोणता असेल? आमदार नारायण कुचे यांचे दुर्लक्ष

 



बदनापूर / प्रतिनिधी एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनापूरमधील जालना-छत्रपती संभाजीनगर बदनापुर रोड शहर उजळविण्यासाठी संभाजीनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पथदिव्यांचे खांब बसविण्यात आले आहे .परंतु एक वर्ष उलटूनही त्यांचे दिवे लागलेले नाहीत. या दिवाळीतही शुभ मुहूर्त येण्याची शक्यता कमी आहे. शहरातील नागरिक पथदिवे लावण्याची मागणी करत आहेत.


गेल्या आठवड्यात श्री गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद या विषयावर बदनापूर पोलीस ठाण्यात शांती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांनी महामार्गावर लावलेले पथदिवे लावण्याबाबत चर्चा केली होती. या बैठकीत महावितरणचे अभियंता आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आमदार नारायण कुचे यांनी संबंधित विभागाला लवकरच पथदिवे लावण्याची सूचना केली होती. परंतु महामार्गावर बसवण्यात आलेले पथदिवे चालू करण्यासाठी शहरात कोणतीही हालचाल दिसून येत नाही. आमदार कुचे यांचे बदनापुर शहरात सर्रास दुर्लक्ष असल्याचे चित्र सपष्ठ दिसत आहे . आमदार कुचे यांच्या बोलण्याकडे कोणतेही अधिकारी , कर्मचारी लक्ष देत नाही 


गेल्या वर्षी बदनापूरच्या नागरिकांना आशा होती की २०२४ च्या दिवाळीत बदनापूर शहर पथदिव्यांनी उजळून निघेल. आता २०२५ ची दिवाळी जवळ आली असताना, पथदिवे सुरू करण्याचा कोणताही कार्यक्रम नाही, त्यामुळे शहर कधीपर्यंत उजळून निघणार आणि हे खांब किती काळ उजळून निघणार, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या निधीतून बदनापूर शहरातील सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या महामार्गावर पथदिव्यांचे खांब तयार झाले आहेत, परंतु दिवाळीपूर्वी वीज टाकण्यात येणारे अडथळे दूर करून शहर उजळून टाकण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments