Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

“हारतखेडा गावचा अभिमान – सुरेश मुळे भौतिकशास्त्र विषयात SET उत्तीर्ण”



पारनेर प्रतिनिधी / गणेश पाटील शेरे


अंबड तालुक्यातील हारतखेडा येथील सुरेश अशोक मुळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या राज्य पात्रता परीक्षा (SET) मध्ये भौतिकशास्त्र विषयात उत्तीर्ण होऊन आपल्या गावाचे, कुटुंबाचे व तालुक्याचे नाव उंचावले आहे.


सुरेश यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नंदु हाडसे, मुख्याध्यापक डी.एन. अवधूत, माजी सरपंच नानासाहेब शेरे, नारायण ढवळे, गोपीनाथ महाराज मुळे, अशोक सराटे, सरपंच रंजीत सुरेश येडे, उपसरपंच राजू बागवान, रखमाजी टिळेकर, चेअरमन विठ्ठल ढवळे, ओंकार ढवळे, बाबासाहेब ढवळे, विठ्ठल मुळे, गोवर्धन मुळे, कैलास देव्हडे, प्रा. रामदास निहाळ, सुधाकर मुळे, बालाजी मुळे, विश्वनाथ गजर, भानुदास जिगे, सुभाष जिगे (पत्रकार पुण्यनगरी), गणेश पाटील शेरे (पत्रकार दैनिक वार्ता अंबड) आदींनी मनःपूर्वक अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


अखंड परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर साध्य केलेले हे यश आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. सुरेश मुळे यांनी दाखवून दिले की ध्येय निश्चित केले तर ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील मोठ्या स्पर्धात्मक परीक्षेत यश संपादन करून ज्ञानाच्या विश्वात आपला ठसा उमटवू शकतात.

Post a Comment

0 Comments