Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जायकवाडी प्रकल्पातून विसर्ग वाढ – गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे!

 


पैठण (दि. 06 सप्टेंबर 2025) – जायकवाडी प्रकल्पातील नाथसागर धरणातून आज रात्री 11:00 ते 11:30 या वेळेत गोदावरी नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात येणार आहे.


गेट क्रमांक 10 ते 27 अशी एकूण 18 गेट्स 0.5 फूट वरून 1 फूटपर्यंत उघडण्यात येणार असून, त्यातून 9,432 क्युसेकवरून दुप्पट म्हणजे तब्बल 18,864 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जाईल.


आवक पाहून विसर्गात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.


👉 नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments