अंबड वार्ता जाफराबाद प्रतिनिधी
संभाजीनगर :शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून जाफराबाद तालुक्याचा लौकिक वाढवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तेली सेना संभाजीनगर यांच्या वतीने दिमाखात सत्कार करण्यात आला.
या भव्य सोहळ्यात विद्यार्थ्यांना मानपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे या सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या ह.भ.प. जान्हवी ताई सोनवणे सोयगावकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “शिक्षण हेच खरे शस्त्र असून ते समाजाला दिशा देणारे आहे. अशा विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन समाजाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे”.
या गौरव सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास व जोश संचारला असून, समाजातही शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

Post a Comment
0 Comments