Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

“जलक्रांतीद्वारे हरितक्रांती” – चित्राल देवा यांचा अभिनव उपक्रम



पारनेर प्रतिनिधी /गणेश शेरे

शेतकऱ्यांच्या आयुष्यात एप्रिल, मे आणि जून महिन्यातील पाणीटंचाई ही मोठी समस्या आहे. यावर तोडगा म्हणून चित्राल देवा यांनी जलक्रांतीचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ओढे, नाले, नदीपात्रांचे खोलीकरण व रुंदीकरण करून, ठिकठिकाणी वॉटर बॅंक तयार करणे आणि प्रत्येक एक किलोमीटरवर बंधारे उभारणे या उपक्रमातून शिवार पाणीदार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.


या कामामुळे विहिरी व बोरवेल वर्षभर पाण्याने भरतील, 200 कुटुंबांना थेट लाभ मिळेल आणि सुमारे 200 ते 400 एकर शेतीला पाणी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे राजस्थानची आकार संस्था या उपक्रमासाठी पुढे आली असून शेतकऱ्यांना विनामूल्य सिमेंट बंधारे उभारून देणार आहे.


संस्थेने काही अटी व नियम ठरवले असून, शेतकऱ्यांनी फक्त विहिरीवरील दगड, ट्रॅक्टर खडी आणि पाणी उपलब्ध करून द्यायचे आहे, बाकी सर्व खर्च संस्था करणार आहे. दीपावलीनंतर तांत्रिक पाहणी होऊन डोनरकडे प्रस्ताव जाईल आणि डिसेंबर महिन्यात बांधकामाला सुरुवात होईल.


देवा चित्राल यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे –

“आपले गाव पाणीदार करा आणि जलक्रांतीद्वारे पुन्हा हरितक्रांती घडवूया!”

Post a Comment

0 Comments