Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

घुंगर्डे हादगाव येथे गणरायाला शांततेत निरोप

 



घुंगर्डे हादगाव ( प्रतिनिधी) अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणरायाला शांततेत निरोप देण्यात आला. घुंगर्डै हादगाव येथे निसर्ग गणेश मंडळ, युवा गणेश मंडळ, महाकाल गणेश मंडळ, मोरेश्वर गणेश मंडळ, हादगावचा राजा गणेश मंडळ, विघ्नहर्ता गणेश मंडळ, शिवशक्ती गणेश मंडळ, संघर्ष गणेश मंडळ, सावता गणेश मंडळ सह आदी गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. महिलापासुन मुलांपर्यंत संपूर्ण कुटुंबे गणपतीच्या मिरवणुका व सजावटी पाहण्यासाठी गावात गर्दी केली होती. छत्रपती संभाजी राजे चौक , शिंगटे गल्ली, महाराणा प्रताप चौक, महावीर चौक, मस्के गल्ली, कुंभार गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्याबाई होळकर चौक मार्गे निघालेला भाविकांचा प्रवास गलहाटी नदीकाठी असलेल्या खंडोबा मंदीर येथे पोहोचला. व लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

Post a Comment

0 Comments